Latest Updates
Home / About Us

About Us

One of the most difficult tasks I have made while making this MajheJob.com website is to create an About Us page. Because About Us said that there you have to write something special about myself Such as, What I was?, What is it now?, what I do now?, What is my financial situation?, What has been my education?, and  Where did I get inspiration to build this MajheJob.com website, etc. For these reasons above I was getting difficult to make this About us page. Because there was nothing special in me And I did not even like that I would complete this page by writing everything good about myself. Then thought that did not want to make About Us page, but there is a website then the About Us page must be. Then I thought instead of writing false, all the facts should be written down and complete this About Us page. Also, who is reading about us page?

 So friends start with my name. My name is Prashant and I live in a small village in the state of Maharashtra, whose population is roughly 3 to 4 thousand people. And My financial situation is not strong, poverty is. Fathers do farm work. If I tell you about studies, I have studied from 1st to 4th in the Z.P.School of the village.  Studies of 5th class to 10th grade have also been done in High School of the village. Then went to Taluka College for further degrees. My education is not too much, I am just graduate, it has been done by YCM.

 After taking a degree, I started giving competitive exams like you, in the hope that I would get a government job. But you also know how big this competition is. That’s the reason I still do not win like thousands of my friends. But the effort has not yet left, because I have not won yet.

 Now the most important thing to me is how I created this website and why. So friends, as I said my education has not got much, I do not have any kind of coding knowledge. But I was able to create this website because there are so many options available on the internet which can be used even if you do not have a coding knowledge. And I do not even say that this website has been created by me alone because my friends have helped me very much directly or indirectly to make this website. which is not possible to mention everyone’s name here. However, if someone’s name is taken the first name comes from Gokul’s. Friends, coding knowledge is needed to create a website and I did not have coding knowledge, so when I needed a coding when creating a website, Gokul helped me. Gokul is my brother cum friend and he is an expert in coding. And Youtube is my biggest Guru to guide me through creating a website. If YouTube does not exist then I could not have created this website, I am very thankful to Youtube. I am grateful to those friends who have helped me directly and indirectly to make this website.

Friends, this website is for all those friends who are looking for a job, who are competing in the competition. I will try here to give them information about the whole of India’s government and private jobs and their hall tickets, exams information, etc. Friends, here you will be provided the test papers of the previous examinations so that you will help in the study. Also, the online exams have been made available to you, so that you can practice online through our website.

Friends, here we are trying to give you as much convenience as possible. We only need your response. So keep visiting the website daily, practice a lot of online exams and tell your friends.

If you have any questions, please contact us.

                                                                                                                      Thank You…!

मला ही MajheJob.com वेबसाईट बनवतांना सर्वात अवघड गेलेले कार्य म्हणजे हेच About Us चे पेज बनवीने. कारण About Us म्हटले कि तिथे आपल्याबद्दल काहीतीरी विशेष लिहावे लागते. जसे कि मी काय होतो, आता काय आहे, काय करतो आणि मला कुठून प्रेरणा मिळाली ही वेबसाईट बनवायची, माझी परिस्थिती कशी आहे, माझे शिक्षण काय झाले आहे वैगेरे वैगेरे. या वरील सर्व मुद्यान मुळेच मला हे About Us चे पेज बनवीने कठीण जात होते. कारण माझ्यात अस विशेष सांगण्यासारख काहीच नव्हत. आणि माझ्याबद्दल सर्व काही चांगले खोट खोट लिहून हे About Us चे पेज पूर्ण करायच हे माझ्या मनालाही पटत नव्हत. मग वाटल कि वेबसाईटला About Us पेज बनवायचज नाही, पण वेबसाईट म्हटलं कि About Us चे पेज हवंच. मग विचार केला कि खोट लिहिण्यापेक्षा का नाही सर्व खर खर लिहून हे About Us चे पेज पूर्ण करावे, असेही About Us पेज वाचतच कोण.

मित्रांनो सुरुवात माझ्या नावापासून करतो. माझे नाव प्रशांत आहे आणि मी महाराष्ट्र राज्यातल्या एका लहानश्या खेड्यात राहतो. ज्याची लोकसंख्या साधारणता 3 ते 4 हजार असलेल माझ गाव आहे. आणि माझी अर्धिक परिस्थिती ही काही बळकट नाही गरीबिचीच आहे, वडील शेतीकाम करतात. शिक्षणाच सांगायचं तर गावातील जिल्हा परिषद शाळेत 1 ली ते 4 थी पर्यंत शिक्षण केले. ५ वी ते 10 वी पर्यंतच शिक्षणही गावातील हायस्कुल मधेच केले. मग पुढे पदवी साठी तालुक्याचा कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. माझ शिक्षणही काही जास्त झालेले नाही, मी फक्त पदवीधर आहे तीपण YCM मधून केली आहे.

मित्रांनो पदवी घेऊन मीही तुमच्यासारखाच स्पर्धा परीक्ष्यांच्या मागे लागलो, कि आपल्यालाही सरकारी नोकरी मिळेल या आशेवर. पण तुम्हालाही माहिती आहे कि ही स्पर्धा किती मोठी आहे. म्हणून मिही माझ्या त्या हजारो लोखो मित्रांसारखा अजूनही यशस्वी झालेलो नाही. पण प्रयत्न अजूनही सोडलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

आता माझ्यासाठी सर्वात महत्वाच सांगायचं म्हणजे कि मी ही वेबसाईट कशी बनवली व का बनवली.  तर मित्रांनो जसे कि मी सांगितले माझे शिक्षण काही जास्त नाही झाले म्हणून मला कुठल्याच प्रकारचे कोडींग नॉलेज नाही आहे. पण जिद्द मात्र होती म्हणून मी ही वेबसाईट बनऊ शकलो कारण इंटरनेट वर असे खूप पर्याय उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून आपण कोडींग नॉलेज नसतांनाही वेबसाईट बनऊ शकतो. आणि ही वेबसाईट मी एकल्यानेच बनवली आहे असेही मी नाही म्हणणार कारण ही वेबसाईट बनवण्यासाठी माझ्या मित्रांनी मला प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्षपणे खूप मदत केली आहे ज्याचे सर्वांचे नाव इथे लिहिणे शक्य नाही. तरीही सांगायचे म्हटले तर सर्वात अगोदर नाव येते गोकुळ चे. मित्रांनो वेबसाईट म्हटली तर कोडींग यायलाच हवी आणि मला कोडींग चा सी ही येत नाही, म्हणून मला वेबसाईट बनवतांना जिथे जिथे कोडींग ची गरज भासली तिथे तिथे मला गोकुळ ने मदत केली. गोकुळ कोडींग मध्ये एक्सपर्ट आहे. गोकुळ माझा भाऊ कम मित्र त्याचे आभार मानावेत तितके कमी आहेत. तसेच वेबसाईट बनवतांना मला मार्गदर्शन करणारा माझा सर्वात मोठा गुरु Youtube आहे, जर का youtube राहिल नसत तर मी ही वेबसाईट बनऊच शकलो नसतो, Youtube चाही मी खूप खूप आभारी आहे. तसेच मी त्यांचाही तितकाच आभारी आहे ज्यांनी मला या वेबसाईट बनवण्यासाठी प्रत्यक्ष असो कि अप्रत्यक्ष मदत केली आहे.

मित्रांनो ही वेबसाईट माझ्या त्या सर्व मित्रांसाठी आहे जे नौकरी च्या शोधात आहेत, जे स्पर्धा परीक्षा देत आहेत. त्यांना इथे मी पूर्ण भारतातील सरकारी किवा खाजगी नोकऱ्यान संदर्भात अचूक माहिती तसेच प्रवेशपत्र, परीक्षांचा निकाल, नोकऱ्यान विषयी काही महत्वाच्या असण्याऱ्या सूचना सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो इथे तुम्हाला मागील परीक्षा झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका PDF मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील जेणे करून तुम्हाला अभ्यासाला मदत होईल, तसेच इथे तुमच्यासाठी Online परीक्षा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामुळे तुम्ही आपल्या वेबसाईट वर Online  परीक्षा देऊन सरावही करू शकता.

मित्रांनो इथे आम्ही तुम्हाला आम्हाला शक्य होईल तितके जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या प्रयत्न करत आहोत. आम्हाला गरज आहे ती  फक्त तुमच्या प्रतिसादाची. म्हणून वेबसाईटला रोज भेट देत रहा, आम्ही उपलब्ध करून देलेल्या online परीक्षांचा भरपूर सराव करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा.

मनात काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क करा.

                                                                                                                        धन्यवाद….!